Dipika Kakar Pregnancy
Dipika Kakar PregnancyTeam Lokshahi

Dipika Kakar Pregnancy: गौहर खाननंतर आता दीपिकानं दिली गुडन्यूज

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडपे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लग्नाच्या चार वर्षानंतर पालक होणार आहेत.

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडपे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लग्नाच्या चार वर्षानंतर पालक होणार आहेत. शोएब इब्राहिमने पत्नी दीपिकाच्या गरोदरपणाची बातमी खास सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. फोटो शेअर करत शोएबने यावेळी सर्वात सुंदर असे वर्णन केले आहे.

या कपलनं चाहत्यासोबत एक गोड बातमी शेअर केली आहे. हे जोडपं लवकरच आईबाबा होणार आहे. सोशल मिडियावर फोटो पोस्ट करत दिपिकाने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या फोटोमध्ये दोघंही बसलेले असून त्यांनी डोक्यावर मॉम टू बी आणि डॅड टू बी असं लिहिलेली कॅप घातली आहे.

या कपलनं 2018 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. दीपिका आणि शोएबच लग्न मूळ गावी मौदाहा, यूपीमध्ये झाला. लग्नाआधी दीपिकाने शोएबसाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. यानंतर दीपिकाचे नवे नाव फैजा ठेवण्यात आले. पण सुरुवातीला दीपिकाने तिचे नवीन नाव गुप्त ठेवले होते. पण लग्नानंतर दीपिकाच्या धर्मांतराची बाब समोर आल्यावर बराच गदारोळ झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com