DRISHYAM
DRISHYAMTeam Lokshahi

'दृश्यम 2':अजय देवगनसाठी सिक्वेलस् ठरतायत लक्की !

दोन दिवसातच होणार्‍या एडवांस बुकिंगकडे बघता हा चित्रपट बॅाक्स आॅफिस वर मोठा गल्ला जमवणार असल्यास काहिच शंखा नाही
Published by :
Team Lokshahi

अजय देवगनचा 'दृश्यम 2'हा चित्रपट 18 नोव्हेंबर ला सिनेमागृहात येणार आहे. परंतू चित्रपट रिलीज होण्याआधिच प्रेक्षक या सिनेमाची एडवांस बुकिंग करून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

अजय देवगन, क्षिया सरन आणि तब्बू यांचा 'दृश्यम 2' हा चित्रपट 2015 साली आलेल्या दृश्यम चा सिक्वेल आहे. या चित्रपटाची एडवांस बुकिंग बघता हा चित्रपट बॅाक्स आॅफिस वर मोठा गल्ला जमवणार आसल्याची शक्यता आहे. हा चित्रपट अजय देवगनच्या गोलमाल या चित्रपटाचा रेकोर्ड तोडणार असल्याच दिसून येत आहे.व एकंदरीतच सिक्वेलस् अजय देवगनसाठी लक्की ठरत आहेत. अजय देवगनने आतापर्यंत 3 सिक्वेलस् केले असून, गोलमाल हा त्याचा पहिला सिक्वेल आहे. 2006 म्धये गोलमाल चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. गोलमालाच्या प्रत्येक सिक्वेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर अजय देवगन आणि करीना कपुरस च्या 'सिंग्म' या चित्रपटाचे दोन सिक्वेलस् आले आणि त्या दोन्ही सिक्वेलस्ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि आता 'दृश्यम 2' सुद्धा चित्रपटगृहात प्रदरशित होण्यासाठी सज्ज आहे.

DRISHYAM
DRISHYAM Team Lokshahi

दृश्यम हा विजय सालगांवकर या सामान्य माणसाच्या आणि त्याच्या कुटूंबाच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. तसेच या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेला देखील प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील यात काहिच शंका नाही.

DRISHYAM
Team India Announced ;दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com