Drishyam 2 OTT Premier
Drishyam 2 OTT PremierTeam Lokshahi

मोठ्या स्क्रीनवर छाप सोडल्यानंतर 'दृश्यम 2' होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज

लवकरच 'दृश्यम 2' हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम' सिनेमाच्या पहिल्या भागाला चांगली पसंती मिळाली होती . आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागालाही चांगली पसंती मिळत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. आता प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. 'दृश्यम 2' सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून सिनेमाप्रेमींना हा सिनेमा कधी रिलीज होणार यांची उत्सुकता लागली होती . आता 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. तसेच काही सिनेमाप्रेमींनी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करावा असेही बोलताना दिसत आहेत.

आता 'दृश्यम 2' या सिनेमाचे डिजिटल राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले असून सिनेमाप्रेमींना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. प्रेक्षकांना 'दृश्यम 2' हा सिनेमा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकणार आहात.

Drishyam 2 OTT Premier
Drishyam 2 Box Office Collection : दृश्यम 2 ची कमाई ठरणार मैलाचा दगड; रिलीजच्याच दिवशी 15.38 कोटींचा टप्पा गाठला!

'दृश्यम 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकूळ घालत असून या सिनेमाने आतापर्यंत 63 कोटीं कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमाने 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच 'दृश्यम 2' ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी जवळपास 26.70 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. लवकरच 'दृश्यम 2' हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल.

Related Stories

No stories found.
Lokshahi Marathi
www.lokshahi.com