'बिग बॉस 16'मध्ये एकता कपूर करणार 'लव्ह सेक्स और धोखा 2'ची घोषणा?

'बिग बॉस 16'मध्ये एकता कपूर करणार 'लव्ह सेक्स और धोखा 2'ची घोषणा?

एकता कपूर घोषणा करण्यासाठी बिग बॉस 16 च्या घरात प्रवेश करणार?

एकता आर कपूर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी 'लव्ह सेक्स और धोखा' हा एक्सपेरिमेंटल चित्रपट दर्शकांच्या भेटीला आणला होता. ज्यामध्ये एमएमएस स्कॅन्डल, ऑनर किलिंग आणि स्टिंग ऑपरेशन्स अशा विषयांवर प्रकाश टाकला होता.

या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल अनेक अंदाज लावले जात आहेत. अशातच, एकता आर कपूर आणि दिबाकर बॅनर्जी बालाजी टेलिफिल्म्सचा पुढील चित्रपट 'लव्ह सेक्स और धोखा 2'ची घोषणा करण्यासाठी बिग बॉस 16 च्या घरात प्रवेश करणार असल्याच्या अफवा आहेत.

बिग बॉस 16 शोची लोकप्रियता लक्षात घेता एकता कपूर याकडे मार्केटिंग म्हणून पाहत आहेत. यात आश्चर्य नाही, कारण एकता आर कपूर नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटिंग करण्यासाठी ओळखली जाते. आता या संधीची एकता फायदा उचलण्याच्या तयारीत आहे.

2010 मध्ये आलेल्या या चित्रपटातून राजकुमार राव आणि नुसरत भरुचा सारख्या कलाकारांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. दोन कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ९.८ कोटींचा जबरदस्त व्यवसाय केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com