Gauhar Khan Baby Born
Gauhar Khan Baby BornTeam Lokshahi

Gauhar Khan Baby Born: अभिनंदन! गौहर खान आणि जैद दरबार यांना झाला मुलगा

गौहर खान आई झाली आहे. 10 मे रोजी तिने मुलाला जन्म दिला.

गौहर खान आई झाली आहे. 10 मे रोजी तिने मुलाला जन्म दिला. याची माहिती गौहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, विक्रांत मेस्सी, डब्बू रत्नानी आणि मृणाल ठाकूर यांसारख्या सेलिब्रिटींनी गौहरला आई झाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

गौहरची पोस्ट

गौहर खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की,'मुलगा झाला. सलाम ऊ अलैकुम आमच्या सुंदर विश्वात, आनंदाचं क्षण घेऊन तो आला आहे. १० मे २०२३ ला आम्हाला खरा आनंद नेमका काय असतो याची जाणीव झाली. आम्हाला मुलगा झाला आहे. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि त्याला आशिर्वाद देणाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत. आईवडील झालेले गौहर आणि जैद...'

Admin

दरम्यान, गौहरनं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ती प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं. गौहरने एक ग्राफिक व्हिडिओ शेअर केला होता. हा मजेशीर व्हिडिओ शेअर करताना तिनं लिहिलं की, जेव्हा Z G ला भेटतो तेव्हा ते दोघं झालं.बिस्मिल्लाह हिर रहमान निर रहीम.तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम राहो.

अशी आहे दोघांची लव्हस्टोरी

जैदने प्रथम गौहरला एका किराणा दुकानात पाहिले, त्यानंतर त्याने तिला मेसेज करून गौहरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली, बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 25 डिसेंबर 2020 रोजी गौहर आणि जैदचे मुंबईच्या ITC ग्रँड मराठा हॉटेलमध्ये लग्न झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com