Janhvi Kapoor
Janhvi KapoorTeam Lokshahi

जान्हवी बोलली वैयक्तिक आयुष्याबद्दल, सिंगल आहे तरी...

जान्हवी म्हणाली की मी सिंगल असून देखील माझ्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी आहे.
Published by :

बॉलिवूडच्या यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हे नाव नक्कीच समाविष्ट आहे. सध्या ती आपल्या कामाबद्दल खुश आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुड लक जेरी' या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सर्वांची मने जिंकली आहेत. मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य कसे चालले हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. चला तर मग जान्हवीकडून जाणून घेऊया की तिच्या आयुष्यात एखाद्या विशिष्ट व्यक्तीने प्रवेश केला आहे की नाही किंवा ती अजूनही अशाच व्यक्तीच्या शोधात आहे.

जान्हवीची लेटेस्ट स्टेटस असे आहे की ती वैयक्तिक जीवनामध्ये सिंगल असूनदेखील समाधानी आहे. पण तिला कधीकधी एकटेपणा जाणवतो असही तिने म्हटलं आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' या शो मध्ये उपस्थित असताना जान्हवीने सिंगल असल्याचे मान्य केले. कोणाला जवळ यायचे असेल तर त्याच्यापासून दूर राहिलेले ठीक राहील असं तिने स्पष्ट केलं. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की मी सिंगल असून देखील माझ्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी आहे. कधीकधी मला एकटेपणा जाणवतो असं म्हणत तिने काही गोष्टी शेअर केल्या.

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor : तिन्ही खानसोबत काम करण्यास जान्हवीने दिला नकार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com