राहुल अन् अथिया एकाच हॉटेलमध्ये...; Video आला समोर
Admin

राहुल अन् अथिया एकाच हॉटेलमध्ये...; Video आला समोर

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वच स्टार्सच्या लिंक-अप आणि लग्नाच्या बातम्या येत असतात. अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वच स्टार्सच्या लिंक-अप आणि लग्नाच्या बातम्या येत असतात. अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. यातच अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाचे कार्यक्रम 21 ते 23 जानेवारी दरम्यान होणार आहेत. सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी आणि केएल राहुल जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत अशी माहिती मिळत आहे.

यातच आता या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. लग्नाच्या आधी बुधवारी रात्री दोघेही जुहूमधील एका हॉटेलमध्ये एकत्र पोहोचले. दोघांचा हॉटेलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, राहुलने ब्लू जीन्स आणि स्काय ब्लू शर्ट घातलेला होता, तर अथियानेही त्याच रंगाचा जीन्स टॉप घातला होता. या व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राहुल अन् अथिया एकाच हॉटेलमध्ये...; Video आला समोर
Athiya Shetty - KL Rahul : अथिया शेट्टी पुढील तीन महिन्यांत केएल राहुलशी लग्न करू शकते, हे असेल लग्नाचे ठिकाण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com