Kapil sharma | Deepika Padukon
Kapil sharma | Deepika Padukon Team Lokshahi

कपिल आणि दीपिकाच्या 'मेगा ब्लॉकबस्टर'चा ट्रेलर रिलीज

'मेगा ब्लॉकबस्टर' हा चित्रपट किंवा मालिका नसून ऑनलाइन शॉपिंग अॅपसाठी जाहिरात मोहीम आहे
Published by :
Sagar Pradhan

कपिल शर्मा, सौरव गांगुली, रोहित शर्मा, रणवीर सिंग, रश्मिका मंदान्ना आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'मेगा ब्लॉकबस्टर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. कपिल शर्मा आणि दीपिका पदुकोण यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली होती, ज्याचे नाव 'मेगा ब्लॉकबस्टर' होते. त्यामुळे या 'मेगा ब्लॉकबस्टर'ची इतकी चर्चा रंगली होती की ट्रेलर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. परंतु आता रिलीज झाला आहे. मात्र,'मेगा ब्लॉकबस्टर' हा चित्रपट किंवा मालिका नसून ऑनलाइन शॉपिंग अॅपसाठी जाहिरात मोहीम आहे.

Kapil sharma | Deepika Padukon
अभिनेत्री अमृता खानविलकरने नेटिझन्सचे टोचले कान

दरम्यान, हे सिनेस्टार कोणत्यातरी मोठ्या चित्रपटात किंवा मालिकेत एकत्र दिसणार असल्याचे चाहत्यांना वाटत होते. परंतु त्यांचा भ्रमनिराश झाला आहे, हे सेलिब्रिटी कोणत्याही जाहिरातीसाठी नाही तर ते एका अॅपच्या जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत. ट्रेलरमध्ये आपण पाहू शकता की रणबीर, दीपिका, कपिल शर्मा, रोहित शर्मा आणि इतर तारे प्रेक्षकांना एका कंपनीच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलबद्दल सांगत आहेत. ट्रेलर शेअर करताना रणवीरने लिहिले, यामुळे ही जाहिरात असल्याचे दिसून येत आहे.

एका ई- कॉमर्स कंपनीच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलचे प्रमोशन करताना सर्व स्टार्स एकत्र पाहून चाहते आनंदी दिसत आहेत. याआधी इतके स्टार्स क्वचितच कोणत्याही जाहिरातीत एकत्र दिसले आहेत. बॉलीवूड, कॉमेडी आणि क्रिकेटच्या विश्वातील मातब्बरांना एकत्र आणणे हेही लहान मुलांचे खेळ नाही. तथापि, कपिल शर्मा, सौरव गांगुली, रोहित शर्मा, रणवीर सिंग, रश्मिका मंदान्ना आणि दीपिका पदुकोण हे त्या अॅपवर एकत्र दिसणार असल्याचे आधीच उघड झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com