Kareena Kapoor
Kareena KapoorTeam Lokshahi

करिनाने 'या' चित्रपटासाठी केली 12 कोटींची मागणी?

चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल आणि फीबद्दल उघडपणे बोललं आहे.

अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ही सध्या तिच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती आमिर खान (Aamir Khan) सोबत दिसणार आहे. हे दोन्ही स्टार्स सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान एका मुलाखतीदरम्यान करिनाने पहिल्यांदाच सीता: द इनकार्नेशन या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल आणि फीबद्दल उघडपणे बोललं आहे.

खरं तर नुकतीच बातमी समोर आली होती की करीना कपूर 'सीता'च्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहे. बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण करून देशातील ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आखली असल्याचे बोलले जात होते. त्याचबरोबर अशा बातम्याही आल्या होत्या की करिनाने ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी चित्रपट निर्मात्यांकडून 12 कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळे त्यांना लोकांच्या टीकेलाही सामोरं जावे लागले होते. त्याच वेळी करिनाने या सर्व अफवांचे खंडन केले असून मला या चित्रपटाची ऑफर कधीच दिली गेली नव्हती.

ती म्हणाली मी कधीच स्पष्ट केले नाही कारण मला ही भूमिका कधीच ऑफर झाली नव्हती. लोकांनी मला या वादात का आणले तेच मला कळत नाही. हे पूर्णपणे खोटे आहे. या प्रकारच्या चित्रपटाबद्दल मला कधीच माहिती मिळाली नाही. बॉलीवूडमध्ये माझ्यापेक्षा चांगल्या अभिनेत्री या भूमिकेत बसतील.

करीना पुढे म्हणते की, मला कोणाचाही अपमान करायचा नाही कारण प्रत्येकाला कथानक हवे असतात. आता या गोष्टींची सवय झाली आहे. आज 100 प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जिथून वेगवेगळ्या बातम्या येतात. त्यामुळे आपण आपले काम केले पाहिजे किंवा आपण प्रत्येक वेळी ट्विट करताना स्पष्ट केले पाहिजे असं देखील तिने सांगितलं.

Lokshahi
www.lokshahi.com