काय समाजलीव ! तुमचा प्रभाकर पण राष्ट्रवादीत..

काय समाजलीव ! तुमचा प्रभाकर पण राष्ट्रवादीत..

‘महाराष्ट्राची हास्यजत्रेतील’ प्रभाकर मोरे या अभिनेत्याने हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधले आहे
Published by :
Siddhi Naringrekar

‘महाराष्ट्राची हास्यजत्रेतील’ प्रभाकर मोरे या अभिनेत्याने हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधले आहे असून त्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मूळचे रत्नागिरीचे असणारे प्रभाकर मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. प्रभाकर मोरे यांनी सुप्रसिद्ध निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केले होते.

प्रभाकर मोरे हे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत पोहचले आहेत. प्रवेश केल्यानंतर त्यांनी म्हटले की, “कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि कोकणातील कला संस्कृतीत काही अडचणी आहेत. त्यामध्ये मदत करण्यासाठी, व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी हा प्रवेश केला. अजित पवार , सुप्रिया सुळे यांचा कलाकारांवर हात आहे. सर्वसामान्य कलाकारांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. अजित पवार यांच्या स्वभावामुळे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.” असे ते म्हणाले.

पक्षप्रवेश होताच अजित पवार यांनी प्रभाकर मोरे यांच्यावर कोकण विभागाचे अध्यक्षपद आणि चित्रपट सांस्कृतीक विभागाची जबाबदारी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com