'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांनी भावुक पोस्ट करत सांगितले कारण
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा मराठी कॉमेडी शो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 2018 पासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आला आहे. परंतु, आता हा कार्यक्रम प्रेक्षकांची रजा घेणार आहे. कलाकारांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
या कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी इंस्टाग्रामवर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे काही क्षण शेअर केले. फोटो पोस्ट करत प्रियदर्शनीने लिहिले की, दोन महिन्यांनंतर भेटू. तर रसिका वेंगुर्लेकरने शेवटच्या शेड्युलचा शेवटचा दिवस. या माझ्या अतरंगी मित्रांबरोबर शेवटचे काही क्षण, असे म्हंटले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर हा कार्यक्रम कायमचा निरोप घेणार असल्याचा समज प्रेक्षकांचा झाला आहे.
परंतु, हा कार्यक्रम बंद होणार नसून काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याचं सांगितले जात आहे. रसिका वेंगुर्लेकरने लिहिले की, काळजी करू नका. हा कार्यक्रम बंद होत नाहीये. आम्ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम छोटीशी सुट्टी घेत आहोत. आम्ही लवकरच पुन्हा तुमच्या भेटीला येऊ, असे तिने सांगितले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम दोन महिन्यांसाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याची जागा सोनी मराठी वाहिनीवर मराठी कोण होणार करोडपती घेणार आहे. यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्राचे कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसविणार आहेत.
