Manasi Naik Instagram Story
Manasi Naik Instagram StoryTeam Lokshahi

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मानसी नाईकची भावनिक पोस्ट चर्चेत...

अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या आगामी चित्रपट तसेच खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा याच्या वाद झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत.

अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या आगामी चित्रपट तसेच खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा याच्या वाद झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. यातच मानसी नाईकने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी नक्की बिनसलं आहे असं दिसून येत आहे.

Manasi Naik Instagram Story
“चंद्रमुखी” वरुन मानसी नाईकने केलेल्या दाव्यावर प्रसाद ओकने दिले उत्तर…

मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा सोशल मीडियावर सक्रिय आहेत. दोघेही एकमेकांसोबाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो नेहमीच शेअर करत असतात. परंतु मानसी नाईक सध्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल पोस्ट करताना दिसत आहे. तिच्या सर्व पोस्ट या भावनिक आहेत. यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.

आज मानसीच्या पतीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मानसीने स्टोरी शेअर केली. ज्या स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मानसी या स्टोरीद्वारे तिच्या नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. मानसीने शेअर केलेली हे स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे. तसेच दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आहेत. यामुळे तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडत आहेत. त्यांच्या नात्यावर अजून दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे 19 जानेवारी, 2021 रोजी झाले होते. लग्नाच्या आधी दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या नात्यातील दुरावा बरेच दिवस चर्चेत होते. मान्सीच्या या पोस्टने या चर्चेला पुष्टी मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com