Kalyani Kurale Jadhav Passed Away
Kalyani Kurale Jadhav Passed Away Team Lokshahi

Kalyani Kurale Jadhav Passed Away : तुझ्यात जिव रंगला फेम कल्याणी कुरुळे-जाधव हिचं कोल्हापूरात अपघाती निधन

कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथे एका डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झालेला आहे.

सतेज औंधकर : कोल्हापूर | मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ठरलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिचा अपघाती मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एका डंपरच्या धडकेत तिचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कल्याणीने हालोंडी सांगली फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाचे हॉटेल सुरु केले होते. या हॉटेलमधून बाहेर पडत असताना एका डंपरच्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेव्यतिरिक्त इतरही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. कल्याणीच्या जाण्याने मराठी टेलिव्हिजनवरील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com