Marathi Movie : स्त्री भ्रूण हत्येवरील Y चित्रपटाची का होत आहे चर्चा?

मराठवाड्यातील बीड जिल्हा एकेकाळी स्त्री भ्रूण हत्येसाठी चर्चेत आला होता. या स्त्री भ्रूण हत्येवर चित्रपट आला आहे. मन हेलावून टाकणारा असा हा चित्रपट आहे.
Published by :
Team Lokshahi

मराठवाड्यातील बीड जिल्हा एकेकाळी स्त्री भ्रूण हत्येसाठी चर्चेत आला होता. या स्त्री भ्रूण हत्येवर चित्रपट आला आहे. मन हेलावून टाकणारा असा हा चित्रपट आहे. वाय नावाच्या या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्राजक्ता माळी यांची मुख्य भूमिका आहे. मूळचे लातूरच्या उदगीर येथील असलेले डॉ.अजित वाडीकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. आज या चित्रपटातील स्टार कास्टने बीडच्या सिनेमागृहास भेट दिली. यादरम्यान चित्रपटातील स्टार कास्टला भेटण्यासाठी बीडकरांनी गर्दी केली. पाहा त्यांच्यांशी साधलेला संवाद...

Y movie
Ankita Lokhande : अंकिताचे हटके फोटोशूट पाहिलेत का?

24 जून रोजी 'वाय' चित्रपट गृहात आला. वाय या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले आदी कलाकार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com