Neena Gupta: लग्नाशिवाय आई झाल्यामुळे नीनाच्या वेदना व्यक्त, म्हणाली - अशा व्यक्तीवर प्रेम करेन असे वाटले नव्हते

Neena Gupta: लग्नाशिवाय आई झाल्यामुळे नीनाच्या वेदना व्यक्त, म्हणाली - अशा व्यक्तीवर प्रेम करेन असे वाटले नव्हते

बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता ही सिने जगतातील दबंग महिला आहे, जिने आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप संकटाचा सामना केला आहे परंतु तीने कधीही हार मानली नाही.
Published by  :
shweta walge

बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता ही सिने जगतातील दबंग महिला आहे, जिने आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप संकटाचा सामना केला आहे परंतु तीने कधीही हार मानली नाही. नीना लग्नाशिवाय आई झाली हे सर्वांना चांगलंच माहीत आहे. 1989 मध्ये तिने लोकांची पर्वा न करता आपली मुलगी मसाबाला जन्म दिला. यादरम्यान अभिनेत्रीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, ज्यावर नीना गुप्ता यांनी मोकळेपणाने बोलले आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये नीनाने सांगितले आहे की त्या कठीण दिवसात तिने स्वतःला कसे तुटू दिले नाही.

नीना गुप्ता एकेकाळी वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्ड्सला डेट करत होती. मसाबा ही नीना आणि विवियन यांची मुलगी आहे. तिच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलताना नीना गुप्ता यांनी ताज्या मुलाखतीत सांगितले की, ज्याच्यासोबत मी कधीच राहू शकत नाही अशा व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा माझा विचार कधीच नव्हता. किंवा अशा व्यक्तीबरोबर मला मूल होईल. असे धाडसाचे कृत्य मी करेन असे कधीच वाटले नव्हते. देवाने मला जे काही दिले, मी त्या प्रसंगांना तोंड दिले.

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, 'मी कधीही हार मानली नाही. मी नेहमीच माझ्या निर्णयावर ठाम राहिले. त्या दिवसांत मी कधीच कोणाला भावनिक किंवा आर्थिक मदत करण्यास सांगितले नाही. मी फक्त सर्व गोष्टींचा सामना केला आणि ते दिवस देखील एन्जॉय केले. याशिवाय, मी काय करू शकते? मी रडू शकले असते किंवा कोणालातरी माझ्याशी लग्न करण्याची शिफारस करू शकले असते. मी रडत आयुष्य वाया घालवले असते. पण मी गोष्टी स्वीकारल्या आणि देवाने जे दिले ते घेऊन पुढे गेले.

नीना गुप्ताच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची 'गुडबाय' या चित्रपटात दिसली होती. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्याचबरोबर आता नीना गुप्ता 'उच्छाई' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नीनासोबत अनुपम खेर, अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि डॅनी डेन्झोंगपा सारखे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत.

Neena Gupta: लग्नाशिवाय आई झाल्यामुळे नीनाच्या वेदना व्यक्त, म्हणाली - अशा व्यक्तीवर प्रेम करेन असे वाटले नव्हते
आलिया-रणबीरच्या मुलीसाठी या पाकिस्तानी अभिनेत्याने घातली लग्नाची मागणी? वाचा सविस्तर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com