...नाहीतर महाराष्ट्राचा देखील बिहार होईल - सुरेखा पुणेकर

...नाहीतर महाराष्ट्राचा देखील बिहार होईल - सुरेखा पुणेकर

एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गौतमीचा अंगावर पाणी ओतून अश्लील नृत्य केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या खूप चर्चेत आहे. गौतमीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तिच्या घायाळ अदाकारीमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये गौतमीचा अंगावर पाणी ओतून अश्लील नृत्य केलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्यावर अनेक कलाकार प्रचंड संतापले होते. गौतमीच्या या नृत्यावर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी तिला चांगलेच सुनावले होते. त्यानंतर गौतमी पाटीलने तिची चूक मान्य करून माफीही मागितली होती. मात्र, पुन्हा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गौतमीवर टीका केली आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गौतमीवर निशाना साधला आहे. त्या म्हणाल्या की, अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करून नाचणे याला लावणी म्हणत नाहीत. जे कलाकार चांगले आहेत, तिला नक्कीच तुम्ही डोक्यावर घ्या, तिला प्रोत्साहन द्या. पण जी अश्लील वर्तन करते, जी अपुरे कपडे घालते, तिला तुम्ही समाजात अजिबातच स्थान देऊ नका, नाहीतर महाराष्ट्राचा देखील बिहार होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

...नाहीतर महाराष्ट्राचा देखील बिहार होईल - सुरेखा पुणेकर
लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली, डान्स फ्लोमध्ये चूक झाली, पण...

दरम्यान, गौतमी पाटीलने याआधी पत्रकार परिषद घेत सर्वांची माफी मागितली होती. मी व्हायरल झालेले नृत्य केले. तेव्हा मी पायात घुंगरू बांधत नव्हते. पण, मला सुरेखा पुणेकर यांनी सांगितल्यानंतर मी माझं नृत्य बदलले. "अर्ध्या रात्री" या गाण्यापासून माझी सर्वत्र चर्चेस सुरुवात झाली. मी आता कुठल्याही प्रकारचे अश्लील नृत्य करत नाही, असेही तिने सांगितले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com