Palak Muchhal-Mithoon
Palak Muchhal-MithoonTeam Lokshahi

Palak Muchhal-Mithoon: पीएम मोदींनी स्टार जोडप्यानां दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, गायकाने व्यक्त केली कृतज्ञता

सुपरहिट चित्रपट 'आशिकी 2' फेम म्युझिकल कपल मिथुन (संगीतकार) आणि पलक मुच्छाल (गायक) विवाहबंधनात अडकले आहेत.

सुपरहिट चित्रपट 'आशिकी 2' फेम म्युझिकल कपल मिथुन (संगीतकार) आणि पलक मुच्छाल (गायक) विवाहबंधनात अडकले आहेत. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ६ नोव्हेंबरला दोघांनी सात फेरे घेतले. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया पोस्टद्वारे दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचवेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे मिथुन आणि पलकचे अभिनंदन केले आहे.

मिथुन आणि पलक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेले पत्र सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. हे पत्र शेअर करत नवीन जोडप्याने पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि लिहिले, 'आदरणीय मोदीजी, तुमचे आशीर्वाद पत्र आमच्या हृदयाला भिडले आहे, या आदर आणि प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो, आमच्यासाठी ही विशेषाधिकाराची बाब आहे. लग्नाच्या शुभ मुहूर्तावर तुमचे आशीर्वाद मिळाले.

2013 मध्ये रिलीज झालेल्या आशिकी 2 या चित्रपटाने पलकला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली होती. या चित्रपटातील गाण्यांनीही मिथुनला बॉलिवूडमध्ये प्रस्थापित केले. या चित्रपटाचे संगीत मिथुनने दिले आहे. या चित्रपटातील पलकची मेरी आशिकी तुम ही हो... आणि चाहून मैं या ना ही गाणी खूप हिट झाली. इथेच पलक आणि मिथुनची भेट झाली. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये अनेकदा करण्यात आला होता. मात्र, दोघांनीही याला दुजोरा दिला नाही. मात्र, आता दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केले आहे.

Palak Muchhal-Mithoon
Neena Gupta: लग्नाशिवाय आई झाल्यामुळे नीनाच्या वेदना व्यक्त, म्हणाली - अशा व्यक्तीवर प्रेम करेन असे वाटले नव्हते
Lokshahi Marathi
www.lokshahi.com