'द व्हॅक्सिन वॉर'च्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांना दुखापत

'द व्हॅक्सिन वॉर'च्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांना दुखापत

'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माते अभिषेक अग्रवाल आता त्यांच्या पुढच्या निर्मिती 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये व्यस्त आहेत.

'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माते अभिषेक अग्रवाल आता त्यांच्या पुढच्या निर्मिती 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये व्यस्त आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आणि विवेक अग्निहोत्रीची पत्नी पल्लवी जोशीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान 'द वॅक्सीन वॉर'च्या सेटवर अभिनेत्रीला दुखापत झाली.

हैदराबादमध्ये द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. या दरम्यान एका गाडीचे नियंत्रण सुटले आणि ती जाऊन पल्लवी जोशी यांना धडकली. मात्र, दुखापत होऊनही पल्लवी जोशीने चित्रपटाचा तो शॉट पूर्ण केला आणि नंतर त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. रिपोर्टनुसार, आता पल्लवी जोशी तब्येत ठीक आहे. शूटिंगदरम्यानचा एक फोटो देखील पल्लवी जोशी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

15 ऑगस्ट 2023 रोजी द वॅक्सीन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com