“चंद्रमुखी” वरुन मानसी नाईकने केलेल्या दाव्यावर प्रसाद ओकने दिले उत्तर…

“चंद्रमुखी” वरुन मानसी नाईकने केलेल्या दाव्यावर प्रसाद ओकने दिले उत्तर…

Published by :
Team Lokshahi

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित "चंद्रमुखी" (chandramukhi) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) साकारणार आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी अमृताचे कौतुक होत असताना मानसी नाईकने (Mansi Naik) एक दावा केला आहे. तर या संपूर्ण वादावर चित्रपटाच्या दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी मानसी नाईक, प्रजक्ता माळी, पुजा सावंत, सोनाली कुलकर्णी अशा मराठीतील विविध प्रसिध्द अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरु होती. ह्यातच अभिनेत्री 'मानसी नाईक' हिने मला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते असे सांगितले आणि मी आणखी चांगली चंद्रमुखी साकारली असती असेही तिने म्हटले आहे. त्यानंतर या वादाला तोंड फुटले होते.

संपूर्ण वादावर चित्रपटाचे दिग्दर्शक 'प्रसाद ओक' यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी अमृता खानविलकरचे नाव ठरले होते. असे सांगत या चर्चांना स्पष्टीकरण दिले आहे. प्रसाद ओक यांनी नुकतंच इंन्टाग्रामवर (Instagram) एक खास व्हिडीओ शेअर करत चित्रपटाविषयीची माहीती दिली आहे.

'मी जेव्हा 'चंद्रमुखी' हा चित्रपट कारायचे ठरवले तेव्हा लावणी (Lavani) या लोककलेला जागतिक पातळीवर न्यायचे ठरवले. मी जेव्हा चित्रपटातील चंद्रमुखी च्या मुख्य भूमिकेसाठी विचार करत होतो तेव्हापासूनच दिग्दर्शक म्हणून अमृता खानविलकर हिचेच नाव समोर येत होते. मी कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीचा विचारही केला नाही. असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. अमृताला नृत्य आणि अभिनय या दोन्हीही कला उत्तम अवगत आहेत. मला विश्वास होता कि ती चंद्रमुखीला योग्य न्याय देईल. विशेष म्हणजे या व्यक्तीरेखेसाठी अमृताने पाच ते सात किलो वजन वाढवलं. त्या काळात लावणी कलावंत झिरोफिगर (Zerofiger) नसायच्या. आणि लावणी करणाऱ्या नृत्यागना नऊवारी साडी (Nauwari saree) नेसायच्या त्या जर भरीव बांधाच्या असतील तरच त्या चांगल्या दिसतात. त्यामुळे अमृताने खूप मेहनत घेतली आहे'. असे त्यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनमध्ये (lockdown) चित्रपटाचे शूटींग (Shooting) थांबले होते. त्यावेळेतही अमृताने तिच्या वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवले. त्यामुळे अमृता हीच माझ्या डोक्यातील चंद्रमुखी होती. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना जर कोणी 'मी ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारली असती' असं म्हणत असेल तर तो विषय वेळीच थांबायला हवा असेही प्रसाद ओक यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com