रणबीर कपूरने रागाच्या भरात थेट चाहत्याचा मोबाईलच फेकला; व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूरने रागाच्या भरात थेट चाहत्याचा मोबाईलच फेकला; व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूरचा अँग्री यंग मॅन लूक पाहून उपस्थित सर्वच लोक आश्चर्यचकित झाले

नवी दिल्ली : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सार्वजनिक ठिकाणी असताना चाहत्यांमध्ये त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी स्पर्धाच लागते. परंतु, रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका चाहत्याचा मोबाईल फेकून देत असल्याचे दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावरुन नेटकरी रणबीर कपूरवर संतापले असून त्याला ट्रोल केले जात आहे.

रणबीर कपूरकडे एक चाहता कसा येतो आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सेल्फी घेताना रणबीरही हसत हसत पोज देताना दिसत आहे. परंतु, हा चाहता वारंवार सेल्फी घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. रणबीरही प्रत्येक वेळी पोज देत असतो. शेवटी रणबीर कपूरला राग येतो आणि त्याने मोबाईल फॅनकडून हिसकावून फेकून दिला.

नेटिझन्स व्हिडिओवर विविध कमेंट करत आहेत. एक यूजर लिहितो, और करो बॉलीवुड को सपोर्ट. दुसरा यूजर लिहितो, बरोबर केले, इतके फोटो का काढतो. तर, आणखी एक यूजर म्हणाला की, लोक किती अहंकारी आहेत हे माहित नाही, तरीही लोक फॉलो करत राहतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com