रणबीर-श्रध्दाच्या 'TJMM'चे गुपित उलगडले; मजेशीर टीझरसह टायटल रिवील

रणबीर-श्रध्दाच्या 'TJMM'चे गुपित उलगडले; मजेशीर टीझरसह टायटल रिवील

निर्मात्यांनी या टिझरमध्ये शीर्षकाच्या 'TJMM' या इनीशियल्सचे अनावरण केले होते. त्यामुळे दर्शकांमध्ये चित्रपटाचे शीर्षक काय असेल यावरून उत्कंठा वाढली होती.

लव फिल्म्सने अलीकडेच आपल्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाचा एक टिझर प्रदर्शित केले. यामध्ये दर्शकांना रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपटाच्या शीर्षकाची झलक पाहायला मिळाली. तसेच, निर्मात्यांनी या टिझरमध्ये शीर्षकाच्या 'TJMM' या इनीशियल्सचे अनावरण केले होते. त्यामुळे दर्शकांमध्ये चित्रपटाचे शीर्षक काय असेल यावरून उत्कंठा वाढली होती. अशातच निर्मात्यांनी अखेर या चित्रपटाचे पूर्ण टायटल रिलीझ केले आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाचे टीझर रिलीझ करण्यात आले असून 'तू झूठी मैं मक्कार' असे टायटल आहे. या चित्रपटात प्रीतमद्वारा म्युजिक आणि अमिताभ भट्टाचार्यद्वारा लिरिक्सकडे इशारा करताना व्हिडिओचे शीर्षक रणबीर आणि श्रद्धा यांच्यातील मजेदार केमिस्ट्रीची ओळख करून देते. टीझरमध्ये श्रद्धा आणि रणबीर कपूर यांनी साकारलेल्या 'झूठी' आणि 'मक्कार' या पात्रांची झलक पाहायला मिळते. टीझरमध्ये या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीखही सांगण्यात आली आहे. होळीच्या दिनी म्हणजेच 8 मार्च 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झुठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. लव रंजनने याआधीही 'प्यार का पंचनामा' किंवा 'सोनू के टीटू की स्वीटी' सारखा हाही चित्रपट मोठा पडदा गाजवणार यात शंका नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि श्रध्दा कपूर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे.

दरम्यान, रणबीर लव रंजन यांच्या चित्रपटाव्यतिरिक्त 'अॅनिमल' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे. तर, श्रद्धा कपूर रुखसाना कौसरच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com