रोहित शेट्टीचे मराठी इंडस्ट्रीत पदार्पण; पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

रोहित शेट्टीचे मराठी इंडस्ट्रीत पदार्पण; पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी बॉलीवूडनंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी बॉलीवूडनंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'स्कूल कॉलेज आणि लाईफ' या मराठी चित्रपटातून रोहित शेट्टी मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. स्कूल, कॉलेज आणि लाइफ हा चित्रपट घेऊन रोहित प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही आज रिलीज झाला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करताना रोहित शेट्टीने म्हंटले की, मी मराठी चित्रपटाची कधी निर्मिती करणार? असा प्रश्न मला माझ्या मराठी चाहत्यांकडून विचारला जायचा. माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी मराठीतील पहिलाच चित्रपट मी घेऊन आलो आहे, असे त्याने सोशल मीडियावर सांगितले आहे. या चित्रपटात तेजस्वी प्रकाश आणि करण परब मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

नावाप्रमाणेच हा चित्रपट शाळा-महाविद्यालयीन जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मनोरंजक आहे. हे पाहून तुम्हालाही तुमचे शाळा-कॉलेजचे दिवस आठवतील. शालेय जीवनात मौजमजा आणि अभ्यासासोबतच तरुणांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

रोहित शेट्टी, पवित्रा गांधी आणि विवेक शाह रिलायन्स एंटरटेनमेंटसोबत या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट 14 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. 2020 मध्ये, जेव्हा तेजस्वी प्रकाशने रोहित शेट्टीचा टीव्ही रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' केला, तेव्हा त्याच्या चित्रपटाची घोषणा झाली. मात्र, काही कारणांमुळे हा चित्रपट रखडला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com