‘RRR’ | 3 दिवसात जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई करणारा  पहिला भारतीय चित्रपट ठरला

‘RRR’ | 3 दिवसात जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला

Published by :
Team Lokshahi

'RRR' बॉक्स ऑफिसवर (box office) रेकॉर्ड तोडत आहे. आता या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये तीन दिवसांत 500 कोटींहून अधिकचा वर्ल्डवाईड (Worldwide) व्यवसाय करून इतिहास रचला आहे. 550 कोटीपेक्षा जास्त बजट मध्येबनलेली 'RRR' तीन दिवसांत जगभरात सगळ्यात जास्त कमाई करणारी पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

तरण आदर्शने पोस्ट शेअर करत म्हटले की,

'RRR' हा भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर (Blockbuster) चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय करून नवा इतिहास रचला (History made) आहे. राम चरण तेजा (Ram Charan Teja) , ज्युनियर एनटीआर (Junior NTR) , अजय देवगण (Ajay Devgan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सारखे स्टारर असलेल्या या सिनेमाने तिसऱ्या दिवशी (रविवार) 130 कोटींहून अधिक कमाई केली. याआधी, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 114.38 कोटी रुपयांचा आणि पहिल्या दिवशी (शुक्रवारी) 257.15 कोटी रुपयाचा जगभरात कमाई केली होती.

तर चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये तीन दिवसांत 100 कोटीचा व्यवसाय करणारी पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. तर चित्रपटाने तेलंगु वर्जन (Telugu version) मध्ये तीन दिवसांमध्ये 126 कोटीपेक्षा जास्तीचा गल्ला जमवला आहे. आणि हिंदी वर्जन (Hindi version) मध्ये इंडियामध्ये तीसऱ्या दिवशी 31.50 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com