सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार

सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. मराठी सोबतच तिने आता बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. सईने अभिनेत्री क्रिती सेनॉन सोबत ‘मिमी’ या चित्रपटात काम केलं होते. तिच्या या कामाचे सर्वांनी कौतुक केलं होते.

सई लवकरच ती मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाउन’मध्येही दिसणार आहे. तर सई ताम्हणकरने नुकतीच तिचा आगामी मराठी चित्रपट ‘फक्त महिलांसाठी’ची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री – दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी करणार आहेत. सई समोर आता चित्रपटांची यादीच आहे. सई आता लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूडच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. तसेच एका लोकप्रिय अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव 'ग्राउंड झिरो’ असणार आहे. सईसोबत बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देवस्कर करत आहेत. या चित्रपटात इम्रान हाश्मी एका लष्कर अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई ताम्हणकर या चित्रपटात हाश्मी हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारणार असून हा चित्रपट म्हणजे एक मिलिटरी ड्रामा असल्याची माहिती मिळत आहे.

Lokshahi
www.lokshahi.com