शर्टलेस फोटोमध्ये सलमान खानने दाखवला फिटनेस; पाहा फोटो

शर्टलेस फोटोमध्ये सलमान खानने दाखवला फिटनेस; पाहा फोटो

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत आहे. तो त्याच्या शर्टलेस फोटोंसाठीही ओळखला जातो. आता त्याने पुन्हा एकदा त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो जिमचा आहे. या फोटोत तो एकदम फिट दिसत आहे. त्याच्या या फोटोंवरही अनेक कमेंट येत आहेत. सलमानचा हा फोटो लोकांना खूप आवडतो.
Published by :
Siddhi Naringrekar

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत आहे. तो त्याच्या शर्टलेस फोटोंसाठीही ओळखला जातो. आता त्याने पुन्हा एकदा त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो जिमचा आहे. या फोटोत तो एकदम फिट दिसत आहे. त्याच्या या फोटोंवरही अनेक कमेंट येत आहेत.

एकाने लिहिले की तू खूप हॉट आहेस. एकाने लिहिले की एक नंबर फोटो सलमान भाई. एका यूजरने लिहिले की, सलमान माझा भाऊ, बॉडी बिल्डिंगचा पिता आहे. सलमानच्या या फोटोला 5 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. सलमान आता टायगर 3 चित्रपटात दिसणार मध्ये दिसणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी हेसुध्दा कलाकार असणार आहेत. यामध्ये इम्रान नकारात्मक भूमिका साकारत आहे.

अलीकडेच सलमान खानला शस्त्र परवाना मिळाला आहे. त्यासाठी त्यांनी अर्ज केला. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनी सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. यानंतर सलमानने परवान्यासाठी अर्ज केला आणि तो त्याला देण्यात आला आहे. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्याला बंदूक ठेवायची आहे आणि यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांचीही भेट घेतली.

शर्टलेस फोटोमध्ये सलमान खानने दाखवला फिटनेस; पाहा फोटो
सलमान खान आणि कटरीनाचा “टायगर 3” हा चित्रपट लवकरच रिलीज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com