जॅकलीनला 'ईडी' ची बेडी
बॉलीवूड अभिनेत्री 'जॅकलीन फर्नांडिस' सापडलीय वादाच्या भोवऱ्यात. २०० कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप. ''तपासयंत्रनेच्या चौकशीत मी माझ्या परीने संपूर्ण योगदान दिले'' असे वक्तव्य दिल्लीतील पटीयाला हाउस कोर्टात सुनावणी दरम्यान जॅकलीन हिने केले. ''मी तपासयंत्रणेला संपूर्ण सहकार्य करून सुद्धा मला मात्र नाराशाजनक वागणूक मिळाली, मात्र 'ईडी' कडून मला फक्त त्रासच दिला गेला '' असा आरोप जॅकलीनने केला.
माझ्या शूट साठी परदेशात फेऱ्या होत असतात, पण आता मला परदेशात जाण्यापासूनही अडवण्यात येत आहे.मला माझ्या कुटुंबियांना भेटण्यापासूनही बंधने घातली गेली. या सर्वं प्रकरणी मी तपास यंत्रनेला ई-मेल ही केला, पण तिथे मला दुर्लक्षित करण्यात आले. मी देश सोडून पळून जाणार आहे, या संदर्भात मला मला लूक आऊट नोटीस जारी केल्याचा दावा केला. परंतु 'ई-डी' कडून केले गेलेले सर्वं आरोप हे व्यर्थ आहेत, असे म्हणत तीने सारे आरोप फेटाळले. सुकेश कडून पैसे घेऊन जॅकलीन पर्यंत पोहोचवल्याचा आरोप पिंकी इराणीवर आहे, याप्रकरणी सुनावणी दरम्यान पिंकी इराणी पटीयाला हाऊस कोर्टात हजर होती. आरोपी जॅकलीन विरोधात 'ई-डी' कडे मनी लाँडरिंग प्रकरणी संभाव्य पुरावे आहेत, या पुराव्या अधारी जॅकलीन हिचा जामीन मंजुर न करण्याची मागणी 'ई-डी' ने केली.पुरावे उपलब्द असून सुद्धा जॅकलीनला अध्याप अटक का नाही झाली हा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला.
डिसेंबर 2011 मध्येही जॅकलीनने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा ही 'ई-डी' ने केला, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आपला निर्णय स्थगित केल्याचे समोर आले.तसेच आज ११नोव्हेंबर रोजी जॅकलीन च्या जामीना संदर्भात काय सुनावणी होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.