Shilpa Shetty
Shilpa ShettyTeam Lokshahi

पापाराझींवर संतापून शिल्पा शेट्टी म्हणाली- 'तोंडात घुसून फोटो काढणार का?' लोकांनी केले ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होत असते. तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होत असते. तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावेळेस शिल्पा शेट्टीचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. तीचा हा व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे आणि त्यावर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर वायरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शिल्पा शेट्टीचा एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शिल्पा शेट्टीचे फोटो काढण्यापूर्वी पापाराझी हताश दिसत आहेत आणि तिला फोटो काढण्याची विनंती करत आहेत. आधी शिल्पा शेट्टी मजा करताना दिसते आणि मग ती त्याला म्हणते, 'मुह में घुस के फोटो लोगे क्या?' त्यानंतर ती तिच्या कारमध्ये बसते आणि निघून जाते.

असे बोलल्याने लोकांनी शिल्पा शेट्टीला ट्रोल करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले आहे, 'किती वाईट वृत्ती आहे.' एका यूजरने लिहिले आहे की, 'या दोन बहिणी खूप ओव्हरअॅक्टिंग करतात.' एका यूजरने लिहिले आहे की, 'वृद्ध महिलेचे ओव्हरअॅक्टिंग. एका यूजरने लिहिले आहे की, 'तोंडात घुसून नाही तर डोक्यावर मारून.' अशा प्रकारे सर्व सोशल मीडिया यूजर्सनी शिल्पा शेट्टीवर निशाणा साधला आहे.

शिल्पा शेट्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'निकम्मा' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट वर्षी 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता शिल्पा शेट्टी 'सुखी' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. या वेबसिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्राही दिसणार आहे.

Shilpa Shetty
अनुष्का-विराटपासून ते रणवीर आणि दीपिकापर्यंतच्या या बॉलीवूडच लग्नांचा झाला एवढा खर्च
Lokshahi Marathi
www.lokshahi.com