(Photo-Instagram@viralbhayan)
(Photo-Instagram@viralbhayan)

श्रद्धा कपूरचं पर्सनल चॅट व्हायरल

Published by :

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे अनेक चाहते आहेत. श्रद्धा सोशल मिडीयावर सुद्धा बरीच सक्रीय असते. नुकतच श्रद्धाला एका शूटिंग लोकेशनला स्पॉट करण्यात आलंय. श्राद्धाच्या या फोटोमध्ये ती सेटवर एका खास व्यक्तीशी चॅट करत दिसत आहे. सेटवर श्रद्धा तिच्या मोबाईलमध्ये रमली होती. श्रद्धाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये श्रद्धा खूपचं सुंदर दिसत होती.

यावेळी श्रद्धा तिच्या मोबाईलमध्ये चॅट करण्यात रमली होती. याचवेळी फोटोग्राफर्सनी श्रद्धाला घेरलं आणि तिचे फोटो क्लिक करू लागले.मात्र काही कॅमेरांमध्ये श्रद्धाचं चॅट देखील कैद झालंय. आता या चॅटचे फोटो लीक झाले असून ते चाांगलेच व्हायरल होवू लागले आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात श्रद्धा कपूरचं चॅटही दिसून येतंय. श्रद्धा एका खास व्यक्तीशी चॅट करत असल्याचं दिसून येतंय. श्रद्धा ज्या व्यक्तीसोबत चॅट करत आहे. ज्या व्यक्तीचा नंबर तिने कोणत्याही नावाने नव्हे तर तीन हार्टचे इमोजी ठेवून सेव्ह केलाय. यात श्रद्धाने लिहिलीय. "मी आयुष्यात कधी तुझ्या सारख्या व्यक्तीला भेटले नाही." यावर उत्तरात समोरच्या व्यक्तीने लिहिलं "मला आनंद आहे की तू असा विचार करतेस."

(Photo-Instagram@viralbhayan)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com