sidharth malhotra and kiara advani
sidharth malhotra and kiara advaniTeam Lokshahi

सिद्धार्थ आणि कियारा लवकरच अडकणार लग्नबंधणात; जाणून घ्या कुठे, कसा होणार हा विवाह सोहळा

६ फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही पद्धतीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे.
Published by :
Sagar Pradhan

बॉलिवूड अभिनेता मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे. सध्या या दोंघांच्याही लग्नाची तयारी सुरू झाली आहे. ६ फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही पद्धतीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नात केवळ १०० ते १५० उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा हा दिल्लीमध्ये असून तो आपल्या कुटुंबियांसोबत आज जैसलमेरकडे रवाना होऊ शकतो. कियारा अडवाणीचे बाबा जगदीप अडवाणी आणि तिची आई जिनेविव्ह जैसलमेर विमानतळावर क्लिक झाले. तेव्हा त्यांना लग्नाबद्दल काय म्हणायचे आहे असे विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले: "मुबारक हो सबको (सर्वांचे अभिनंदन)." असे ते म्हणाले.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची प्रेमकहाणी 2021 च्या शेरशाह चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली, जो त्यांचा एकत्र पहिला चित्रपट होता. सिद्धार्थ आणि कियारा हे एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे सोबत स्पाॅट देखील व्हायचे. हे स्टार कपलही एकत्र 2021 मध्ये मालदीवला गेले सोबतच त्यांनी 2023 चे दुबईमध्ये एकत्र स्वागत केले, जिथे त्यांच्यासोबत डिझायनर मनीष मल्होत्रा आणि चित्रपट निर्माता करण जोहर होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com