Sunil Shende Passed Away
Sunil Shende Passed AwayTeam Lokshahi

Sunil Shende Passed Away : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

मराठी-हिंदी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालंय.

मराठी-हिंदी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालंय. रात्री 1 वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरफरोश, गांधी, वास्तव अशा विविध चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या.

Sunil Shende Passed Away
Kalyani Kurale Jadhav Passed Away : तुझ्यात जिव रंगला फेम कल्याणी कुरुळे-जाधव हिचं कोल्हापूरात अपघाती निधन

सुनील शेंडे राहत्या घरी चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. विलेपार्ले येथील राहत्या घरीच रात्री एक वाजता त्यांचे निधन झाले आहे. आज सुनील शेंडे यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सुनील शेंडे यांनी अनेक हिंदी-मराठी सिनेमांत वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळेच त्यांना हरहुन्नरी अभिनेता म्हटले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि भारदस्त आवाजामुळे त्यांना पोलीस, राजकारणी अशा भूमिका जास्त मिळाल्या आहेत.

नव्वदच्या दशकात सुनील शेंडे खूप लोकप्रिय होते. निवडुंग, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर, ईश्वर, नरसिम्हा अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत सुनील शेंडे यांनी काम केलंय. त्यांनी आपल्या अभिनयानं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही वेगळी छाप सोडली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com