चाहत्यांसाठी वाईट बातमी; सुष्मिता सेनला आला हार्ट अटॅक

चाहत्यांसाठी वाईट बातमी; सुष्मिता सेनला आला हार्ट अटॅक

सुष्मिता सेनच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुष्मिताला हार्ट अटॅक आला असून सध्या तिच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सुष्मिता तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेतही असते. अशातच, सुष्मिता सेनच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुष्मिताला हार्ट अटॅक आला असून तिच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता मात्र तिची प्रकृती ठीक आहे. सुष्मिताने स्वतः ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे.

सुष्मिता सेनने नुकताच तिचे वडील सुबीर सेन यांच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत ती म्हणाली की, तुमचे हृदय नेहमी आनंदी आणि मजबूत ठेवा. कारण जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा ते तुमच्यासाठी असेल. काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. अँजिओप्लास्टीही करण्यात आली आहे, तसेच स्टेंटही बसवण्यात आला आहे. हृदय आता सुरक्षित आहे. आणि विशेष म्हणजे, माझ्या डॉक्टकांनी सांगितले की माझे हृदय खरोखर मोठे आहे.

असे बरेच लोक आहेत ज्यांचे मी आभार मानू इच्छिते. त्यामुळे मला वेळेवर उपचार मिळू शकले. त्याच्या तत्परतेमुळे मी सावरले. तेही मी पुढच्या पोस्टमध्ये सांगेन. मी ही पोस्ट फक्त माझ्या चाहत्यांसाठी अपडेट देण्यासाठी केली आहे. आता मी ठीक आहे आणि पुन्हा नवीन जीवन जगण्यास तयार आहे, असे सुष्मिताने सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com