Swara Bhaskar
Swara BhaskarTeam Lokshahi

Swara Bhaskar : ट्रोलर्सच्या ट्रोलिंगला स्वराचे प्रतिउत्तर...

ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देताना नुकतीच स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :

उदयपूरच्या घटनेवरून बराच गदारोळ झाला आहे. उदयपूर हत्याकांडामुळे सोशल मीडियावरही येणाऱ्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत लोक बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिला ट्रोल करत आहेत. तिने या प्रकरणावर तिचं वक्तव्य केलेलं आहे. दरम्यान ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देताना नुकतीच स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे उदयपूर घटनेवर लोकांकडून होत असलेल्या टीकेवर स्वरा भास्करने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ज्या अंतर्गत स्वरा भास्करने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की माझ्या टाइमलाइनवर काही लोकांकडून उदयपूरमधील निर्दयी हत्येच्या प्रकरणाचा माझा निषेध पिन करण्यात आला आहे.

Swara Bhaskar
वेब सीरिज विश्वात शिल्पा शेट्टीची दमदार एन्ट्री; 'या' सीरिजमध्ये झळकणार

ती म्हणतेय की मी या घटनेवर चुकीचे काय बोलले आहे. मला काही घृणास्पद प्रवृतींच्या लोकांच्या वतीने विचारले जात आहे. स्वरा भास्कर सुरुवातीपासूनच या प्रकरणावर आपले मत व्यक्त करत आहे. स्वरा भास्करचा असा संताप आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

त्‍याच्‍या आधारे एका ट्विटर युजरने लिहिले आहे की हिंमत असेल तर ग्राउंड लेव्हलवर या आणि सकारात्मकतेची भावना दाखवा. याशिवाय आणखी एका युजरने लिहिले आहे की अशा ट्विटरवर तुम्ही तुमचे ज्ञान देऊ नका आणि इतरांची दिशाभूल करण्याचे काम देखील अजिबात करू नका.

Swara Bhaskar
Kajol : 'या' वेबसिरीजमध्ये काजोल झळकणार...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com