Sonu Sood
Sonu SoodLokshahi Team

Sonu Sood : करिअर बद्दल बोलताना सोनूने सांगितलं की...

टॉलिवूडमध्ये आपली अभिनय क्षमता सिद्ध करणाऱ्या अभिनेता सोनू सूद(Sonu Sood) यांचे सगळेच चाहते आहेत.
Published by :

बॉलिवूड(Bollywood) आणि टॉलिवूडमध्ये आपली अभिनय क्षमता सिद्ध करणाऱ्या अभिनेता सोनू सूद(Sonu Sood) यांचे सगळेच चाहते आहेत. तो जितका अभिनेता आहे. तितकाच तो एक चांगला माणूस देखील आहे. ही गोष्ट कोरोनाच्या काळात सर्वज्ञात झाली आहे. त्याच्या काही चाहत्यांनी त्याला देव दर्जाही दिला.

Sonu Sood
आलिया-रणबीरने दिली गुड न्यूज, कपूर परिवाराच्या घरी आनंद

सोनूसाठी लोकांना पैशांची मदत करणे सोपे नव्हते. कारण तो मुंबईत आला तेव्हा त्याला प्रचंड संघर्ष अन मेहनत करावी लागली होती. पण आज सोनूने आपल्या मेहनतीने उंचीही तेवढ्याच प्रमाणात गाठलेली आहे. सध्या तो कोणत्याही गरजूंना मदत करण्यास अजिबात कमी पडत नाही. जाणून घ्या सोनू सूदच्या आयुष्याशी संबंधित काही अस्पर्शित पैलू.

सोनूने सांगितले की, जेव्हा तो पहिल्यांदा मुंबईत आला होता तेव्हा त्याला इतर स्टार्सप्रमाणे खूप संघर्ष करावा लागला. मुंबईत आल्यावर तो कोणालाच ओळखत नव्हता. त्यामुळे त्याला मदत करणारा बॉलीवूडमध्ये त्याचा गॉडफादर कुणीच नव्हता. पण सोनूने हार मानली नाही आणि तो खंबीरपणे उभा राहिला.

Sonu Sood
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचे स्पेशल फोटोशूट पाहिलंत का?

मुंबईत कोणता रस्ता कोणत्या फिल्म स्टुडिओकडे जातो हेही त्याला माहीत नव्हते. सोनूच्या कुटुंबातील एकही सदस्य चित्रपटसृष्टीतील नाही. सुरुवातीच्या काळात सोनूच्या करिअरमध्येही अनेक चढ-उतार आले. त्यांना वर करण्याऐवजी खाली खेचणारेही काही लोक आढळून आले. सोनू मुंबईत आल्यावर त्याने साऊथ फिल्म इंडस्ट्री निवडली नाही. परंतु सोनूला तामिळ आणि तेलगू सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. बॉलीवूडमध्ये सुरुवातीच्या काळात फारसे बोलणे नव्हते त्यामुळे साऊथच्या चित्रपटांकडे वळणे त्याला बरे वाटले. त्याला फक्त काम करायचे होते आणि त्याला साऊथच्या चित्रपटांमध्ये ही संधी मिळाली. जेव्हा कोणी नवीन उद्योगात येतो तेव्हा लोक त्याची मदत करण्याऐवजी पाय खेचतात. परंतु सोनू थांबला नाही आणि फक्त चालत राहिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com