टीडीएम चित्रपटाला स्क्रीन मिळवून देणार; 'लोकशाही'च्या बातमीनंतर मुनगंटीवारांचे आश्वासन

टीडीएम चित्रपटाला स्क्रीन मिळवून देणार; 'लोकशाही'च्या बातमीनंतर मुनगंटीवारांचे आश्वासन

लोकशाहीच्या बातमीची दखल सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून मोठी घोषणा केली आहे

भाऊराव कऱ्हाडे यांचा 'टीडीएम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, थिएटरमध्ये या चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही नसल्याची खंत टीमने लोकशाही मराठी चॅनेलवर व्यक्त केली होती. याची दखल सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून मोठी घोषणा केली आहे. टीडीएम चित्रपटाला स्क्रीन मिळवून देणार, असे आश्वासन मुनगंटीवारांनी दिले आहे. तसेच, मराठी चित्रपटांसाठी राज्यात 'नाट्य चित्रमंदिर' संकल्पना राबवणार असल्याची माहिती दिली आहे.

चित्रपटगृहांमध्ये स्क्रीन मिळत नसल्याचा आरोप करत प्रदर्शन थांबवणाऱ्या टीडीएम चित्रपटाला स्क्रिन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी 'लोकशाही न्यूज' सोबत बोलताना दिले आहे. याशिवाय याबाबतची तक्रार आपल्यापर्यंत आली नसून हा प्रश्न महसूल विभागाअंतर्गत येतो. तरीही आपण पुढाकार घेऊन या चित्रपटाच्या टीमसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय राज्यातील नाट्यगृहांमध्ये नाटकांशिवाय मराठी चित्रपट दाखवण्यासाठी 'नाट्य चित्रमंदिर' ही नवी संकल्पना आणणार असल्याची माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे. यानुसार नाट्यगृहांमध्ये आता नाटकांसहित चित्रपटही झळकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, टीडीएम हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे आणि सिनेप्रेमी हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मात्र, सिनेमागृहात शो नसल्या कारणाने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया भाऊराव कऱ्हाडे यांनी दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com