टीडीएम चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळेना,  कलाकारांना अश्रू अनावर
Admin

टीडीएम चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळेना, कलाकारांना अश्रू अनावर

भाऊराव कऱ्हाडे यांचा चा 'टीडीएम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

भाऊराव कऱ्हाडे यांचा चा 'टीडीएम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र या चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही आहे. आजवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी स्क्रीन मिळण्याच्या विषयावर बोलले आहेत.

या चित्रपटाला थिएटलमध्ये स्क्रीन मिळत नसल्यानं या चित्रपटाच्या टीमला अश्रू अनावर झाले. टीडीएम' हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे आणि सिनेप्रेमी हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मात्र सिनेमागृहात शो नसल्या कारणाने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. असे भाऊराव कऱ्हाडे म्हणाले.

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीडीएम चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्यानं या चित्रपटातील कलाकार भावूक झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com