अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण

अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण

चित्रपटात बॉलीवूडचे दोन सर्वात मोठे अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना एकत्र पाहायला मिळणार

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची चर्चा सर्वत्र होत आहे. अशातच, आता या सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग भारतात पूर्ण झाले. पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाचे पुढील शेड्यूल स्कॉटलंडमध्ये शूट केले जाईल. यासाठी अक्षय आणि टायगरसह संपूर्ण टीम 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या पुढील शेड्यूलची तयारी करत आहे.

या चित्रपटात बॉलीवूडचे दोन सर्वात मोठे अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना एकत्र पाहायला मिळणार असून, हे कॉम्बिनेशन प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसेच, पृथ्वीराज सुकुमारन देखील या सिनेमाद्वारा खलनायकाच्या व्यक्तीरेखेतून आपले अभिनय कौशल्य दाखवत दर्शकांच्या भेटीला येणार आहेत.

अलीकडेच निर्माता जॅकी भगनानी, टायगर श्रॉफ यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा प्रोड्युस्ड, वाशू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटद्वारा प्रस्तुत आणि अली अब्बास जफरद्वारा लिखित आणि दिग्दर्शीत तसेच, एएझेड फिल्मच्या सहयोगाने पूजा एंटरटेनमेंटचा अ‍ॅक्शन एंटरटेनर 'बड़े मियां छोटे मियां' हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com