Har Har Mahadev Movie
Har Har Mahadev Movie Team Lokshahi

'हर हर महादेव' चित्रपटावर प्रेक्षकांची नाराजी....

चित्रपटाद्वारे चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचे समोर आले.
Published by :
Team Lokshahi

'हर हर महादेव' चित्रपट आता वादाच्या कचाट्यात सापडला आहे, या चित्रपटाद्वारे चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचे समोर आले. त्यामुळे इतिहास प्रेमींचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षात, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य यांवर आधारित- फर्जंद, फात्तेशिखस्त, पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव असे अनेक चित्रपट येऊन गेले,पण त्या चित्रपटांवर अशी कोणत्याच प्रकारची टीका झाली नाही.मात्र 'हर हर महादेव' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Har Har Mahadev Movie
Dadra & Nagar Haveli Bypoll | भाजपचा पराभव; शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी

या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते, पण इतिहासाचा असा गैरवापर केल्याचे समजल्याने इतिहासप्रेमींमध्ये निराशाजनक वातावरण पाहायला मिळाले. 'हर हर महादेव' या चित्रपटामध्ये अपशब्दांचा वापर, दिशाभूल करणारी वाक्यरचना यामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. मात्र या चित्रपटाने ब़ॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे.

'हर हर महादेव' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लवकरच प्रतापराव गुजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटावर आता काय प्रतिक्रिया येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com