Bigg Boss Marathi Season 4
Bigg Boss Marathi Season 4Team Lokshahi

'बिग बॉस मराठी 4'चा 'या' दिवशी होणार ग्रॅण्ड प्रीमियर

बिग बॉस हा रिलिटी शो निर्मात्यांनी इतर अनेक भाषांमध्ये प्रसारित केला आणि या रिअ‍ॅलिटी शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे.

बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो निर्मात्यांनी इतर अनेक भाषांमध्ये प्रसारित केला आणि या रिअ‍ॅलिटी शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. यादरम्यान, मराठी बिग बॉसबाबत प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 'बिग बॉस मराठी सीझन 4' (Bigg Boss Marathi Season 4) सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोचे सूत्रसंचालन अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करतात.

मराठी भाषेतील 'बिग बॉस मराठी सीझन 1'ला २०१८ मध्ये सुरू झाला होता. तर आतापर्यंतच्या बिग बॉस मराठीच्या गेल्या ३ सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला पाहिला आहे. तर आता प्रेक्षकही बिग बॉस मराठी सीझन 4ची आतुरतेने वाट पाहत असल्याने या शोचा 4 सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी सीझन 4' चा ग्रॅण्ड प्रीमियर सोहळा 2 ऑक्टोबरपासून होणार आहे. नुकताच मराठी 'बिग बॉस मराठी सीझन 4' चा हटके टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Season 4
Sneha Wagh : 'बिग बॉस मराठी 3' फेम स्नेहाने १५ वर्षांनंतर लोकलने केला प्रवास

कलर्स मराठी वाहिनीवर 'बिग बॉस मराठी सीझन 4' प्रसारित होणार आहे. तर डिसेंबरमध्ये झालेल्या 'बिग बॉस मराठीच्या सीझन 3' ची ट्रॉफी विशाल निकम (Vishal Nikam) याने जिंकली आहे. तर उपविजेता जय दुधाणे (Jay Dudhane) ठरला. या सीझनच्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये मीनल शहा, जय दुधाणे, विशाल निकम, विकास पाटील आणि डॉ उत्कर्ष शिंदे यांचा समावेश आहे. हा सीझन खूप धमाकेदार झाला होता. त्यामुळे 'बिग बॉस मराठी सीझन 4' हा सीझन कसा असणार आहे आणि कोण स्पर्धक असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com