“द काश्मीर फाइल्स” ची सोशल मीडियात सर्वाधिक चर्चा, काय आहे चित्रपटात?

“द काश्मीर फाइल्स” ची सोशल मीडियात सर्वाधिक चर्चा, काय आहे चित्रपटात?

Published by :
Team Lokshahi

नुकताच रिलीज झालेला चित्रपट "द काश्मीर फाइल्स" (The Kashmir Files) संपूर्ण देशभरात सुरु आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित द काश्मीर फाइल्स या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट दररोज अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने रविवारी देखील बॉक्स कलेक्शनमध्ये नवीन स्थान प्राप्त केले आहे.


चित्रपटाने रविवारी तब्बल 14 कोटीचा गल्ला जमा केला आहे. रविवारी झालेल्या कमाई नंतर 'द काश्मीर फाईल्स' हा कोरोना काळातील पहिला ब्लॉकबस्टर (Blockbuster) चित्रपट ठरला आहे.
4 कोटी खर्चून बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 3.25 कोटींची कमाई केली होती.  शनिवारी 8.25 कोटींची कमाई केली. यानंतर रविवारी सर्व रेकॉर्ड मोडत 'द काश्मीर फाइल्स'ने आपल्या बॅगेत 14 कोटी रुपयांचा गल्ला जमा केले.
हा चित्रपट 1990 दशकातील काश्मीर पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आणि सौरभ पांडे (Saurabh Pandey) यांनी एकत्रितपणे लिहिले आहे.या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) , दर्शन कुमार (Darshan Kumar) , पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यासारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com