चित्रा वाघ यांनी मला मारण्याची धमकी दिली; उर्फी जावेदची महिला आयोगाकडे धाव

चित्रा वाघ यांनी मला मारण्याची धमकी दिली; उर्फी जावेदची महिला आयोगाकडे धाव

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. यावरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत.

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. यावरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. त्यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी नंगानाच चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उर्फी जावेदने थेट महिला आयोगात दाद मागितली आहे. चित्रा वाघ यांनी मला मारण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप उर्फीने केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ व उर्फी जावेदमधील वाद आता शिगेला पोहचला आहे. चित्रा वाघ यांच्या आक्षेपांनंतर उर्फी त्यांना सातत्याने डिवचत आहे. चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यामध्ये सध्या ट्विटर वाद सुरू आहे. यात अनेक राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. अशातचही चित्रा वाघ उर्फीविरोधात आक्रमक झाल्या असून महिला आयोगावर चित्रा वाघ यांनी आरोप केले होते. तर,  ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाडच रंगवेन, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी उर्फीला इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर उर्फी जावेदने थेट महिला आयोगात धाव घेतली आहे. चित्रा वाघ यांनी मला मारण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. उर्फीने महिला आयोगाकडे ईमेल करून सुरक्षेची मागणी केली आहे. यामुळे या दोघींमधील वाद अधिकच चिघळणार यात शंका नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीची तक्रार केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली. ही नोटीस मिळाल्यानंतर आंबोली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून उर्फीने तिचा जबाब नोंदवला. त्यानंतर तीन ट्विट करत हिंदू संस्कृती काय ते आधी समजून घ्या असं म्हणत चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com