Urfi Javed, Chitra Wagh
Urfi Javed, Chitra WaghTeam Lokshahi

उर्फी जावेदचा शिवीगाळ करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली, राजकारण्यांना काही कामं नाही...

मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी
Published by  :
shweta walge

उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. यावेळेस भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. आज थेट त्यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेत पत्र दिले आहे. उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली आहे. याबद्दल चित्रा वाघ यांनी एक ट्वीटही केले आहे. या एकूण वादात आता उर्फी जावेदने शिवीगाळ करत प्रत्युत्तर दिलं आहे.

Urfi Javed, Chitra Wagh
Ved Movie Review : प्रेमातील वेडेपण अधोरेखित करणारा चित्रपट

उर्फी जावेद ट्वीट

उर्फी म्हणाली की, “माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी एका पोलिसांच्या तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही खरी कामं नाही आहेत का? या राजकारण्यांना, वकिलांना कळत नाही का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील. माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. चित्रा वाघ, मी तुम्हाला आणखी चांगल्या कल्पना देते, तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा, या सर्व समस्या मुंबईत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या.

Urfi Javed, Chitra Wagh
उर्फीच्या अडचणी वाढल्या! चित्रा वाघ यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

याआधीही चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर ट्विटरवरुन हल्लाबोल केला होता. अरे..हे काय चाललयं मुंबईत रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला पोलिसांकडे कलमे आहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी टीका केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com