Urmila Matondkar
Urmila Matondkar Team Lokshahi

मोहसिनने शेअर केलेल्या 'या' पोस्टवर उर्मिलाची प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या (Urmila Matondkar) सर्व चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर तिचा चाहतावर्गही खूप आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या (Urmila Matondkar) सर्व चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर तिचा चाहतावर्गही खूप आहे. उर्मिला मार्च 2016 मध्ये मोहसिन अख्तरसोबत (Mohsin Akhtar) लग्रनगाठ अडकली होती. मोहसिनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. मोहसिनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका लहान चिमुकल्या बाळासोबत तो दिसत आहे. मोहसिनने फोटो शेअर करुन या फोटोला खूप खास असं कॅप्शन देखील दिल आहे. या फोटोला पाहून उर्मिला आणि मोहसिन हे आई-वडील होणार आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

मोहसिनने शेअर केलेल्या फोटोवर उर्मिलाने एका मुलाखतीदरम्यान प्रतिक्रिया देताना म्हणाली की, 'आयरा माझ्या भावाची मुलगी आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मोहसिनने तो फोटो पोस्ट केला होता. ही पोस्ट पाहून मला अनेकांचे मेसेजेस आले आणि त्यानंतर मी ती पोस्ट मोहसिनला एडिट करायला सांगितली.

मोहसिनने या फोटोला कॅप्शन देताना लिहिला की, 'छोटी राजकुमारी, तू माझ्या हृदयावर राज्य करतेस. तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा' या फोटोला पाहून अनेक चाहत्यांनी प्रश्न विचारला मला की, 'ही तुमची मुलगी आहे का?' त्यानंतर मोहसिननं ही पोस्ट एडिट करुन 'माझी भाची' असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिलं.

Lokshahi
www.lokshahi.com