ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

आपल्या अभिनयानं नाट्य आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला.
Published by :
Siddhi Naringrekar

आपल्या अभिनयानं नाट्य आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.

प्रदीप पटवर्धन यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. मराठी रंगभूमीवरील एक अतिशय विनोदी कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मोरुची मावशी हे त्यांचं नाटक खूप गाजलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com