Virat-Anushka
Virat-AnushkaTeam Lokshahi

विराट-अनुष्काची मुलगी वामिकाची पहिली झलक, तिचा क्यूटनेस पाहून चाहते पडले प्रेमात

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्मा आणि गोंडस मुलगी वामिकाही दिसत आहेत.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्मा आणि गोंडस मुलगी वामिकाही दिसत आहेत. हा व्हिडिओ वृंदावनचा आहे, जिथे कोहली कुटुंबासह स्वामी प्रेमानंद जी महाराज आश्रमात आशीर्वाद घेण्यासाठी आले होते.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 4 जानेवारी 2022 रोजी वृंदावन येथील एका आश्रमाला भेट दिली. हे जोडपे श्री हित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांना भेटण्यासाठी आले होते. या दोघांसोबत त्यांची मुलगी वामिकाही उपस्थित होती. आपले वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणे पसंत करणाऱ्या या जोडप्याने ही मथुरा-वृंदावन भेट देखील मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवली होती, तरीही एका चाहत्याने आश्रमात त्यांचा व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला.

विराट-अनुष्का आणि वामिकाचा आश्रमात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वामिकाचा चेहरा अस्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये वामिका आई अनुष्काच्या मांडीवर बसलेली दिसत आहे तर विराट कोहलीही तिच्यासोबत बसला आहे. पुढे असेही दिसते की अनुष्का आश्रमात गुरूंच्या पाया पडते आणि आपले डोके टेकवते. हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक त्यावर कमेंट करत आहेत.

Virat-Anushka
Malaika Arora Fitness Secret: वजन कमी करण्यासाठी मलायका अरोरा रोज पिते 'हे' पेय
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com