‘नरेंद्र मोदी काँग्रेसला घाबरतात; संसदेत खोटं बोलतात’ | Rahul Gandhi

‘नरेंद्र मोदी काँग्रेसला घाबरतात; संसदेत खोटं बोलतात’ | Rahul Gandhi

Published by :
Published on

देशात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील 'आप' करत आहेत. यांनी गलिच्छ राजकारण देखिल केले आहे. अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली आहे. या पक्षांनी राज्यांतून आलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे कोरोनाचा हाहाकार झाला. याशिवाय त्यांनी काँग्रेसवर चांगलेच टीकास्त्र सोडलं होतं.

याला प्रतिउत्तर देत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान खोटं बोलत आहेत तसेच, नरेंद्र मोदी काँग्रेसला घाबरतात. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी सातत्याने नेहरुंवर टीका करत असतात. काँग्रेसमुळेच आज देशाचे संविधान टिकून आहे. कधीकाळी 2 खासदार असलेला भाजप पक्ष आज सत्ताधारी आहे,

भाजपचा धंदा पूर्णपणे मार्केटींगचा आहे. पंतप्रधानांचं संपूर्ण भाषण हे काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंवरच होतं. मात्र, भाजपाने काय केलं, याबाबत पंतप्रधान काहीही बोलले नाहीत. पंतप्रधानांच्या विदेशनितीमुळे चीन व पाकिस्तान एक होताना दिसत आहेत, जे देशासाठी धोकादायक आहे. काँग्रेस हा खरं बोलणारा पक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com