
नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी करत भाजपचे विक्रांत पाटील यांनी आज विधीमंडळ परिसरात लक्षवेधी आंदोलन केले.
सिडकोने बांधलेल्या घरांच्या किंमती मधून जमिनीची किंमत वगळली तर या घरांच्या किमती किमान २० ते २५ लाखांनी कमी होतील, असा दावा आमदार विक्रांत पाटील यांनी केला आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट चे आमदार समीर कुणावर यांची चौथ्यांदा विधानसभा तालीका अध्यक्ष पदी निवड
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आमदार समीर कुणावर यांच्या नावाची घोषणा
याअगोदर सलग सात तास सभागृहाचे कामकाज चालविण्याचा विक्रमसुद्धा समीर कुणावर यांच्या नावावर आहे नोंद
त्यांच्या तालिका अध्यक्ष पदी निवडीने हिंगणघाट सिंधी रेल्वे मतदारसंघात निर्माण झाले आनंदाचे वातावरण
कृष्णा खोपडे यांना धमकी दिली प्रकरणी भाजप आमदार आक्रमक झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झाले आहे
तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता
कोकणात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला
पण दुरुस्ती रस्त्यांची अजून करण्यात आलेली नाही
अधिकारी ढगाकडे बोट दाखवत आहेत म्हणजे त्यांना अजून पाऊस हवा
अधिकारी कोकणातील रस्ते दुरुस्त करत नाहीत
कोकणातील रस्त्याचे निकष बदलले पाहिजेत
जे अधिकारी लक्ष देत नाहीत त्यांचा बंदोबस्त करायला हवा
कणकवली तालुक्यातील खारेपाटण बंदरवाडी येथे राहणाऱ्या विनायक धोडपिसे यांच्या राहत्या दुमजली घराला सकाळी आग लागून सुमारे ३.५६ लाखांचे नुकसान झाले.
सुदैवाने घरात राहणाऱ्या व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नाही.
परंतु, घरातील फर्निचर व इतर साहित्यासह संपूर्ण छप्पर जळून खाक झाले. बागेतील झाडांवर औषध फवारणीच्या पंपाचा वापर करत आग आटोक्यात आणण्यात स्थानिकांनी यश मिळविले.
दरम्यान, याबाबत महसूल विभागाने पंचनामा केला असून आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
पुण्यातून आज इंडिगो एरलाईन्स चे ४८ विमाने घेणार प्रस्थान
पुणे विमानतळावर कुठला ही गोंधळ नाही, परिस्थिती पूर्ववत होण्याच्या मार्गावर
८ डिसेंबर रोजी पुण्यात तब्बल ११ हजार ८१२ प्रवाशांचे आगमन तर ११ हजार ५६१ प्रवाशांनी ठेवलं प्रस्थान
पुण्यातून ८ डिसेंबर रोजी ७४ विमानांचे आगमन तर ७२ विमानांचे उड्डाण
इंडिगो वगळता कुठल्या ही इतर कंपन्यांचे विमान रद्द नाही
- राज्यातील महिला आणि बालसुधारगृहाच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची सरकारची धक्कादायक कबुली
- भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकारचं उत्तर
- विधान परिषदेत लेखी उत्तरातून सरकारची कबुली
- सुधारगृहातील अनेक पदे रिक्त असल्याचंही उघड
- बाह्ययंत्रणेच्या भरवशावर महिला आणि बालसुधारगृहाची सुरक्षा नको - चित्रा वाघ
- महिनाभरात सर्व रिक्त पदे भरू - मंत्री अदिती तटकरे यांचे विधान परिषदेत उत्तर
मालेगाव–गुजरात महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला..
वीज वितरण कंपनीच्या अनियमित आणि दुर्लक्षयुक्त कारभाराविरोधात शेतकरी संतप्त..
पोहाणे, रामपुरा, कजवाडे, आठवण परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन..
कांदा व डाळिंब उत्पादक शेतकरी वेळेवर वीज न मिळाल्याने मोठ्या संकटात.
वेळेप्रमाणे वीजपुरवठा न झाल्याने पिकांचे मोठे नुकसान
ऊसाला 3500 रुपये प्रति टन भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू..
अजित पवारांचा कारखाना सोलापुरातून ऊस घेतो, आणि 3500 भाव देतो...
पण जिल्ह्यातील कारखान्यांचा पंचवीसशे रुपये भाव..
उसाच्या प्रति टन भावासाठी शेतकरी झाले चांगलेच आक्रमक
छत्रपती संभाजीनगरातील कर्णपुरा मैदान, रेल्वे स्टेशन रोड परिसरात अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने छापा टाकत दोन इसमांना अटक केले आहे.
सय्यद फेरोज सय्यद अकबर उर्फ अंधा फेरोज आणि अयान शेख चांद शेख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दोघांच्या ताब्यात कोडीन सिरपच्या तब्बल 31 बाटल्या, दोन मोबाईल हँडसेट आणि एक मोटारसायकल असा एकूण 1 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोन्ही आरोपींवर छावणी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
* मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना कोर्टाची १६ डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्याची मुदत
* स्वतः हजर राहण्याच्या आदेशानंतरही रोहित पवारांनी वकिलांमार्फत मांडली भूमिका
* कोकाटे यांचा ‘रम्मी खेळत’ असल्याचा व्हिडिओ कोणी काढला? पवारांना व्हिडिओ कोणी दिला? या मुद्द्यावर अधिक तपासाची मागणी
* दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आज नाशिक कोर्टात मांडली आपापली बाजू
साताऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर इव्हेन्शन इनोवेशन इनक्युबॅशन अँड ट्रेनिंग सेंटर (CIIIT) स्थापन करण्याचा प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीने राज्य सरकारकडे सादर केला आहे
हा प्रकल्प 115 कोटी रुपयांचा असून लिंबखिंड नागेवाडी परिसरात हे नवे आयटी पार्क साकारत असून याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे..
निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय
यादी प्रसिद्धीसाठी ५ दिवसांची मुदतवाढ
१० डिसेंबर ऐवजी आता १५ डिसेंबरला मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणार
मतदार केंद्रांची यादी १५ ऐवजी २० डिसेंबरला प्रसिद्ध करणार
मतदान केंद्र निहाय मतदार याद्या २२ ऐवजी २५ डिसेंबरला प्रसिद्ध होणार
राज्यातील वाढत्या रस्ते अपघात आणि मृत्यूंच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने कायम अनुज्ञप्ती (लायसन्स) देताना वाहनचालक चाचणी प्रक्रिया अधिक कठोर करण्याचे निर्देश जारी केले आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर (RTO) कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे,
राज्यातील तब्बल 80 टक्के अपघात हे वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचे समोर आले आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील खळेगाव येथील दत्तात्रय वायाळ व मनीषा वायाळ दांपत्याला गावातील पोलीस पाटील असलेले दिलीप वायाळ यांच्यासह इतर नऊ जणांनी घरात येऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
या बाबत तक्रार बीबी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे,
या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..