Latest Marathi News Update live : पुण्यात आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार

Marathi Live Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Shivsena Ncp Party Name Symbol Hearing: शिवसेना नाव अन् चिन्हाबाबात उद्या सुनावणी

शिवसेना (shivsena party symbol) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी उद्या (21 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा (Ajit Pawar) पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

BMC Election 2026 Mumbai Mayor : मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आता आपला महापौर बसवण्याचा मुहूर्त निश्चित केला आहे. त्यानुसार येत्या 30 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेत भाजपचा (BJP) महापौर कारभाराची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) हे मंगळवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत. यानिमित्ताने भाजपचे मुंबई आणि महाराष्ट्रातील नेते सध्या दिल्लीत आहेत. याच नेत्यांच्या गोटातून येत्या 30 तारखेला भाजपचा महापौर मुंबईची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Mahanagarpaliaka Mayor)

Sanjay Raut : भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांबद्दल संजय राऊत यांचा खळबळजनक खुलासा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे यांना फार जास्त गांर्भियाने घेण्याची गरज नसल्याचे सांगताना संजय राऊत दिसले. संजय राऊत यांनी म्हटले की, महापाैर हा महायुतीचाच तर मग साौदेबाजी कशासाठी भ्रष्ट पैशांवर निवडणुका बिनविरोध करून घेतल्या. मुळात म्हणजे असे आहे की, महापाैर पदाला फार अधिकार नाहीत ते शोभेचे पद आहे. विदेशातल्या महापाैरांना अनेक अधिकार असतात, पण आपल्याकडील महापाैरांना असे काही अधिकार नाहीत. या लोकांना स्थायी समितीमध्ये जास्त रस आहे. कारण तिथे पैशांचे व्यवहार होतात. मुळात म्हणजे असं आहे की, ब्लॅकमेल करून दुसऱ्याचे स्वत:च्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे. केडीएमसीमधील आमचे दोन नगरसेवक सध्या कुठे दिसत नाहीयेत, हे खरे आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Kolhapur : 'EVM जिंदाबाद'; कोल्हापूरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी

(Kolhapur) कोल्हापूरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. EVM जिंदाबाद असं मोठ्या अक्षरात लिहित कोल्हापूरात हे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली असून बॅनरवरील लिहिलेला मजकूर हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Nagpur : नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीने शिफारसपत्र तयार करून महिलेची फसवणूक

(Nagpur) मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीने शिफारसपत्र तयार करून महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अडीच लाखांची महिलेची फसवणूक केल्याचं समोर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने खोटे शिफारसपत्र तयार केल्याचे उघड झाले. वैभव भैय्याजी सेवतकर असे आरोपीचे नाव असून सीताबर्डी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. बदली नागपूर, अमरावती किंवा चंद्रपूरला मिळवून देतो असे आमिष दाखवले तसेच आरोपीने आपण वीज वितरण विभागात कर्मचारी असल्याचा बनाव केला.

Davos 2026 : दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डंका, महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीचे करार

जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum) दावोस परिषदेत महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने दावोस येथे रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक करार केले असून, राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांच्यात तब्बल १ लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Mumbai Local : CSMT–पनवेल प्रवास गारेगार; २६ जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २६ जानेवारी २०२६, प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी/वडाळा रोड ते पनवेल मार्गावर एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे सीएसएमटी–पनवेल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि गारेगार होणार आहे. मध्य रेल्वेच्या नव्या नियोजनानुसार हार्बर मार्गावर दररोज १४ एसी लोकल फेऱ्या धावतील. यापूर्वी १ डिसेंबर २०२१ रोजी हार्बर मार्गावर पहिल्यांदा एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र एसी लोकलचे तिकीट व पासचे दर सामान्य लोकलपेक्षा अधिक असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यातच काही सामान्य लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आणि अखेर हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

Rohit Pawar : 'महाराष्ट्रात रोजगार वाढवायचा असेल तर उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक हवी' रोहित पवारांचे ट्विट

दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषद 2026 दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार जाहीर करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अनेक सामंजस्य करार (MOU) झाले असून, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण आणि सूचक प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दावोस 2026 मध्ये आतापर्यंत झालेल्या करारांपैकी अनेक कंपन्या या भारतातील किंवा पर्यायाने महाराष्ट्रातीलच आहेत. ही बाब निश्चितच सकारात्मक आहे. मात्र, याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरही मोठ्या प्रमाणात करार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Asim Sarode : शिवसेना पक्ष चिन्हाबाबत उद्या सुनावणी; अ‍ॅड. असीम सरोदे यांचे ट्विट, म्हणाले...

(Asim Sarode) शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सलग दोन दिवस युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या ऐतिहासिक प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यानच न्यायालयाने अंतिम सुनावणीचा संकेत दिला होता. त्यामुळे आता या प्रकरणावर लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IndiGo : 'दंडाची रक्कम खूपच कमी'; इंडिगोवरील दंडावर वैमानिक संघटनांनी व्यक्त केली नाराजी

(IndiGo) इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मोठा धक्का दिला आहे. डिसेंबर अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले होते. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला होता. अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले होते.त्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळांवर अडकल्याचे पाहायला मिळाले.

Akshay Kumar : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा जुहू येथे भयंकर कार अपघात

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीने थेट पलटी मारली. अक्षय कुमार पत्नीसोबत विमानतळावरून जुहू येथील बंगल्याकडे निघाला होता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा जुहू येथील बंगल्याकडे जात असताना मोठा कार अपघात घडला. हा अपघात इतका भयंकर होता की, एका मर्सिडीज कारने पलटी मारली. अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी विमानतळावरून त्यांच्या घराकडे निघाले होते आणि दोघेही एका कारमध्ये होते. त्यांच्या गाडीच्या मागे सुरक्षारक्षकांची गाडी होती.

Winter Season : थंडीतील पार्ट्यांना महागाईची फोडणी, माशांचा तुटवडा,चिकनही महागलं

हिवाळ्याच्या दिवसांत मांसाहारी जेवण आणि पार्टींची खास मजा असते. थंडीमध्ये मासे, चिकन, मटण यांची चव अधिकच खुलते. मात्र यंदाच्या थंडीच्या हंगामात मांसाहारप्रेमींच्या आनंदावर महागाईने मोठे सावट टाकले आहे. मासे, चिकन आणि मटणाच्या दरात झालेल्या वाढीमुळे घरगुती जेवणापासून ते पार्टीपर्यंत सगळ्याच गोष्टी महाग झाल्या असून, सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.

Amit Thackeray : नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? म्हणत अमित ठाकरेंनी केली 'ही' पोस्ट

(Amit Thackeray) महापालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. गेल्या तीन दिवसापासून नवनिर्वाचित नगरसेवक हे या हॉटेलमध्ये थांबून आहेत.

Solapur : सोलापूरातून इंदूरसाठी विमानसेवा उद्यापासून सुरू होणार

(Solapur ) सोलापूरातून इंदूरसाठी विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेचा उद्यापासून इंदूरपर्यंत विस्तार होणार असून सोलापूराहून दुपारी 2.50 वाजता विमान उड्डाणं भरेल आणि दुपारी 3.55 मिनिटांनी हे विमान मुंबईत पोहोचेल.

Congress : पुण्यात आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार

पुण्यात आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार असून संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com