शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर

शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर

शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आता पाचवी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी पंढरपूरमधून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली असून पंढरपूरमध्ये काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची चौथी यादी जाहीर

भाजपची आता चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत दोन उमेदवारांना संधी मिळाली आहे. तर यात उमरेडमधून सुधीर पारवे आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता मात्र मीरा भाईंदर याठिकाणी गीता जैन यांना संधी नाहीच. भाजपचे एकूण 148 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम

सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. माहिम विधानसभा मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होण्याची शक्यता असून सदा सरवणकर माघार घेणार का याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभेसाठी काँग्रेसचे 102 उमेदवार जाहीर

विधानसभेसाठी काँग्रेसचे 102 उमेदवार जाहीर करण्यात आले असून मविआमध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आहेत.

महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचा घोळ अद्याप कायम

महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचा घोळ अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून 270 जागांसाठी उमेदवार घोषित तर महायुतीकडून 262 जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नॉट रिचेबल

पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नॉट रिचेबल आहेत. यामुळे त्यांचे कुटुंबीय मोठ्या चिंतेत पडले आहेत. वनगा यांचे दोन्ही फोन बंद असल्याने कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू आहे. तर घरातून अचानक निघून गेलेले वनगा अजूनही घरी परतले नाही.

भाजपचे हेमंत रासने भरणार आज उमेदवारी अर्ज

कसबा मतदार संघ पुन्हा भाजपकडे खेचून आणण्यासाठी हेमंत रासने मैदानात उतरणार आहेत. पुण्यातील लक्षवेधी असलेल्या कसब्यातून आज भाजपचे हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार असून महायुतीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत रासने उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर सकाळी दहा वाजता होणार रॅलीला सुरुवात केली जाणार आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ राहणार उपस्थित राहणार आहेत.

भाजपा आमदार बबनराव लोणीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

भाजपा आमदार बबनराव लोणीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परतुर येथे आज भाजपच्यावतीने शक्तीप्रदर्शन करत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणीकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार अर्ज दाखल करणार असून महायुती आणि मविआत जागा वाटपाचा घोळ कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

नाना पटोले आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

नाना पटोले आज दाखल उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शक्तिप्रदर्शन करत नाना पटोले अर्ज दाखल करणार आहेत.

शायना एनसी यांनी शिवसेनेमध्ये केला पक्ष प्रवेश

शायना एनसी यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. आज शायना एनसी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

पुण्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली; पर्वतीमधून आबा बागुल विधानसभा लढण्यावर ठाम

पुण्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. पर्वतीमधून आबा बागुल विधानसभा लढण्यावर ठाम आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही अशी त्यांची भूमिका आहे.

चंद्रशेखर बावनकुळे करणार आज उमेदवारी अर्ज दाखल

चंद्रशेखर बावनकुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून कामठी मतदारसंघातून बावनकुळे साडे अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होणार असून मोठ शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.

18 उमेदवारांसह मनसेची सातवी यादी जाहीर

विधानसभा निवडणुक तोंडावर येताच आता मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. मनसेच्या आतापर्यंत सहा यादी समोर आल्या त्यादरम्यान आत मनसेची सातवी यादी समोर आली आहे. यामध्ये एकूण 18 उमेदवारांची नाव समोर आली आहे. त्यामध्ये वाशिममधून गजानन वैरागडे, बाळापूरमधून मंगेश गाडगे यांसह आणखी उमेदवारांची नावे या सादीत आली आहेत.

युगेंद्र पवार यांची आज बारामतीत जाहीर सभा

उमेदवार युगेंद्र पवार यांची आज जाहीर सभा पार पडणार आहे. बारामतीत ही सभा होणार असून या सभेला शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com