जळगाव जिल्हा बँक निवडणुक; मविआचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता

जळगाव जिल्हा बँक निवडणुक; मविआचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता

Published by :

मंगेश जोशी, जळगाव | जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तीन गटात केवळ एक अर्ज आला आहे. धरणगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सजय मुरलीधर पवार ,पारोळाचे आमदार चिमणराव पाटील,एरंडोल अमोल चिमणराव पाटील हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवड झाल्यात जमा आहेत.त्यामुळे महाविकास आघाडी खातं उघडण्याची शक्यता निर्माण झालीय.

जळगाव जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. धरणगाव,एरंडोल आणि पारोळा विविध कार्यकारी सोसायटी गटातून एकच अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.धरणगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार,पारोळा गटातून शिवसेना आमदार चिमणराव पाटील व एरंडोल गटातून शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील यांचेच केवळ अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे तिघे बिनविरोध निवड होत असल्याचे दिसत आहे. हे महविकास आघाडीचे यश मानले जात आहे.

राष्ट्रवादीचा जाणीव पूर्वक यू-टर्न -गिरीश महाजन

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल मधून राष्ट्रवादीने जाणीव पूर्वक यू-टर्न घेवून भाजपला फॉर्म भरण्यास संधी मिळू नये म्हणून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला असल्याचा आरोप भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला. भाजप 100% जागांवर ही निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे असा सामना?

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते. मात्र काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीने देखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे. तशी माहिती भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे काँग्रेसनेसुद्धा स्वबळाचा नारा दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com