Rahul Gandhi
Rahul Gandhiteam lokshahi

National Herald Case : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने राहुल गांधींना नव्याने बजावले समन्स

Published by :
Shweta Chavan-Zagade

नॅशनल हेराल्ड प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नव्याने समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना १३ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, काँग्रेसने गुरुवारी सांगितले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, परंतु नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात त्या ८ जून रोजी ईडीसमोर हजर होतील.

Rahul Gandhi
Rajyasabha Election 2022 : मविआची खेळी; बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांना भेटणार

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीने दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले होते. यामध्ये राहुल गांधी यांनी गुरुवारी ( २ जून) व सोनिया गांधी यांनी ८ जूनला ईडीच्या मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहावे, असे या समन्समध्ये म्हटले होते. त्यानुसार, आता याप्रकरणी ईडीने राहुल गांधी यांना नव्याने समन्स बजावले असून त्यांना १३ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com